शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
3
उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"
4
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन' सीन; त्यातही किंग कोहलीचा प्रॅक्टिस सेशनमधील फोटो लीक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : श्रीनिवास वनगा अन् एकनाथ शिंदेंमध्ये दिलजमाई; मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच दिला शब्द
6
“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे
7
शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?
8
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कन्येचा विवाहसोहळा; दोन राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित
9
लग्नाचं वय १८ वरून ९ वर्ष करण्याचा विचार; महिलांचा विरोध पण इराक सरकारचा तर्क भलताच
10
पुतण्यानेच केली काका, काकू आणि ३ भावंडांची हत्या; १९९७ मधील 'त्या' घटनेचा घेतला बदला
11
"माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे माझा काय मुकाबला करणार", अब्दुल सत्तारांचे विधान
12
“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके
13
"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?"
14
“फडणवीसांनी माझे नाव घेऊ नये, मनोज जरांगेंचे घ्यावे, मराठा आरक्षणावर बोलावे”; ओवेसींचे आव्हान
15
इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना
16
१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी
17
अनिल अंबानींच्या कंपनीला ₹२८७८ कोटींचा नफा; यापूर्वी तोट्यात होती कंपनी; ₹३६ वर आला शेअर
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: शिराळ्यामध्ये निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा
19
नितीश कुमार पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले, पंतप्रधान मोदी तत्काळ खुर्चीवरून उठले अन्...; सभेचा VIDEO व्हायरल
20
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

"काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 2:01 PM

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात आयोजित लोकजागर अभियानात माधवी लता बोलत होत्या. 

सोलापूर : काँग्रेसचे नेते संधिसाधू, अवसरवादी आहेत. त्यांना गरिबांच्या समस्येबद्दल काहीही देणे घेणे नाही, अशी टीका हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांनी रविवारी केली. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात आयोजित लोकजागर अभियानात माधवी लता बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, काँग्रेसच्या सर्व नेत्यांना जहागीरदारीतून सत्ता मिळाली. या नेत्यांना काहीही कमवावे लागले नाही. वरपासून खालपर्यंत सर्व नेते जहागीरदारीचे साम्राज्य चालवतात. गरिबाच्या घरात अन्न गेले आहे की नाही, त्यांना रोजगार मिळतोय की नाही याबद्दल त्यांना काहीही देणे घेणे नसते. केवळ ते जहागीरदारीची परंपरा चालवत आहेत. ज्यांना देशाची संस्कृती माहिती नाही, त्या लोकांच्या हातात अनेक वर्षे सत्ता राहिली. त्यामुळे संस्कृतीचा ऱ्हास झाला असा दावाही माधवी लता यांनी केला.

यावेळी परिषदेचे प्रांत सदस्य लक्ष्मण चव्हाण, संपर्कप्रमुख पुरुषोत्तम उडता, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, खजिनदार हितेश माधू, जिल्हा मंत्री संजय जमादार आणि बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी धर्मप्रसार प्रमुख रवी बोल्ली आदी उपस्थित होते. 

हैदराबादेत वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा भ्रष्टाचारहैदराबाद शहरात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर गरिबांच्या वस्ती आहेत. या मालमत्ता ताब्यात घेऊन काही लोकांनी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. यातून केवळ गरिबांचे नुकसान झाले. जमिनी लाटणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे कमावले. हे थांबवण्याची हिंमत कोणामध्येही नाही, असे माधवी लता म्हणाल्या.

यावर कधी बोलणार?माधवी लता म्हणाल्या, काही लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीविरोधात कधीच बोलत नाहीत. ब्रिटिशांनंतर भारतातील ब्रिटिश विचारांच्या लोकांनी भारतावर ६० वर्षे राज्य केले. तसेच, वक्फ बोर्डाच्या नावाखाली अनेक जमिनी विकल्या गेल्या. त्यावर कधी बोलणार आहात? असा सवालही माधवी लता यांनी केला.

टॅग्स :Solapurसोलापूर