आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. काँग्रेस भवनसमोर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जमले व त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, उपाध्यक्ष भीमाशंकर बिराजदार, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी महापौर सुशीला आबुटे, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, अर्जुन पाटील, शिवलिंग सुकळे, एनएसयुआय अध्यक्ष गणेश डोंगरे, युवक शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, सुनील रसाळे, ए. डी. चिन्नीवार, आशा म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, सुमन जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, विठ्ठल भंडारी, अशोक कलशेट्टी, सातलिंग शटगार, आप्पासाहेब बगले, जावेद शिकलगार, चंद्रकांत कोंडगुळे, वीणा देवकते, शोभा बोबे, सुभाष चव्हाण, अनिल मस्के, युवराज जाधव, कमरुनिस्सा बागवान, सूर्यकांत शेरखाने, जाकीर पैलवान, रमेश जाधव, चक्रपाणी गज्जम, आयेशा शेख, अनुराधा सोनकांबळे, करीम शेख, नूरअहमद नालवार, किरण पवार आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. सुधीर खरटमल यांनी यावेळी बोलताना शासनाच्या धोरणावर टीका केली. अन्नदाता शेतकरी जगला तरच देश टिकणार आहे. पण आज शेतकरी कर्जामुळे प्रचंड अडचणीत असताना सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. नैराश्येमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरीही शासनाने डोळे उघडले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना कर्जमाफीसाठी त्यांनी दिंडी काढली होती. पण आज ते सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत. यामुळे त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असून, शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी रेळेकर यांना दिले. -------------------------जिल्ह्यातील नेत्यांची दांडीकाँग्रेस शहर व जिल्हा आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. पण उत्तर व दक्षिण तालुका जवळच असताना जिल्ह्यातील बऱ्याचशा नेत्यांनी आंदोलनाला दांडी मारल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शहर पदाधिकारीच अग्रेसर होते. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांची सही होती, पण आंदोलनाच्या सुरुवातीला ते उपस्थित नव्हते.
सोलापूरात कर्जमाफीसाठी काँग्रेसची निदर्शने
By admin | Published: April 10, 2017 8:10 PM