शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सोलापूर महापालिका परिवहन सभापतीसाठी काँग्रेसची एमआयएमला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:46 PM

सभापतीपदासाठी तिघांचे अर्ज: शिवसेनेची भूमिका आज ठरणार

ठळक मुद्देपरिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक १६ मार्च रोजी होणार सभागृह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला

सोलापूर : अखेरच्या घटका मोजत असलेल्या परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपाबरोबरच शिवसेना आणि एमआयएमच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे मनपा निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढविलेल्या एमआयएमच्या उमेदवारांना काँग्रेसच्या सदस्यांनी साथ दिली आहे. 

परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक १६ मार्च रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज दिवस होता. सकाळी साडेअकरा वाजता भाजपतर्फे गणेश जाधव यांनी नगर सचिव कार्यालयात येऊन दोन वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल केले. सकाळी साडेदहा वाजता प्रदेश भाजपकडून जाधव यांचे नाव आल्यावर शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, मावळते सभापती दैदीप्य वडापूरकर, संजय कोळी, राजेश काळे, श्रीशैल बनशेट्टी, वीरेश उंबरजे, भैरप्पा भैरामडगी, संतोष कदम, मल्लिनाथ सरगम आदी उपस्थित होते. त्यानंतर १२ वाजेच्या सुमाराला शिवसेनेतर्फे तुकाराम मस्के यांनी उमेदवारी दाखल केली.

त्यांच्यासमवेत परशुराम भिसे, विजय पुकाळे उपस्थित होते. दुपारी दीड वाजेच्या सुमाराला एमआयएमतर्फे साकीर सगरी यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांच्या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून काँग्रेसचे सदस्य नितीन भोपळे व टेकाळे यांनी सह्या केल्या आहेत. भविष्यातील आडाखे डोळ्यांसमोर ठेवून महाआघाडी कायम ठेवण्यासाठी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते   महेश कोठे यांच्याशी गुरुवारी बातचीत करून शिवसेनेची भूमिका ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

परिवहन समितीत भाजपचे सहा तर शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे दोन आणि एमआयएमचा एक सदस्य आहे. भाजपचा सभापती होण्यासाठी स्थायी समितीचा सभापती असणे गरजेचे होते. आता दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडणार असल्याने चिठ्ठीद्वारे सभापतीचे भवितव्य ठरणार आहे. 

शिवसेनेतर्फे उमेदवारी दाखल करण्यात आलेली असली तरी झोन समिती, स्थायी समिती निवडणुकीचे गणित गृहीत धरल्यास एमआयएमसाठी माघार घेतली जाऊ शकते, असे चित्र दिसत आहे. १६ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन सभापतीची निवडणूक पार पाडली जाणार आहे. परिवहन सभापतीपदासाठी आज उमेदवारी दाखल करण्याचा दिवस असल्याने सभागृह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

मनपा परिवहनची स्थिती बिकटमनपा परिवहनची स्थिती सध्या एकदम बिकट आहे. ४५० कर्मचारी आणि मार्गावर केवळ २७ बस धावत आहेत. उत्पन्न दीड लाखांवर तर खर्च साडेपाच लाखांवर आहे. त्यामुळे परिवहनला दैनंदिन तीन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. कर्मचाºयांना गेल्या आठ महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे काम करण्याची त्यांची मानसिकता नाही. संपावर जाण्याची कर्मचाºयांनी तयारी केली आहे. प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे रजेवर गेले आहेत. परिवहनची अशी स्थिती असतानाही सभापतीच्या गाडीसाठी रस्सीखेच दिसून येत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाElectionनिवडणूकPoliceपोलिस