शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सत्तेची मुजोरी होती म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने नाकारले : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 8:28 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये विरोधकांच्या ईव्हीएमवरील टीकेवरून शरसंधान साधले.

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप यात्रेवेळी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपाचा झेंडा दिला. याचबरोबर जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे नातेवाईक राणा जगजित सिंह यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. 

यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये विरोधकांच्या ईव्हीएमवरील टीकेवरून शरसंधान साधले. सत्तेची मुजोरी होती म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने नाकारले. बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, तर सोलापुरात जय सिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असे कसं, असा सवालही उपस्थित करत परिक्षेला नापास झालेल्या मुलाचे उदाहरण दिले. 2004 ते 2014 च्या निवडणुका ईव्हीवर झाल्या. तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का, मोदी जिंकल्यावरच ईव्हीएम खराब झाल्याची ओरड मारू लागल्याचा आरोप त्यांनी केला.

पश्चिम महाराष्ट्रातले सत्ताधारी असूनही तेथील एकही प्रकल्प पूर्ण करू शकले नाहीत. आम्ही हे प्रकल्प पूर्ण केले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण करून दाखवू. कोकणात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळविण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तिजोरी नेहमीच खुली केली, असेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुन्हा भाजप महायुतीचे  सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

यात्रा का काढली?  विरोधकांची झोप उडवणारी महाजनादेश यात्रा आहे. पाच वर्षात काय केले याचा हिशोब देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढलेली आहे. आभार मानण्यासाठी, हिशोब देण्यासाठी, सूचना मागण्यासाठी ही यात्रा काढल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या पक्षातील आमदार-खासदार हे भाजप-शिवसेनेचे जात असल्यामुळे शरद पवार यांचा त्रागा झाला त्यामुळेच पत्रकारांवर ते चिडले अशी टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे काय पोर आहेत का, असा सवालही केला. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे लवकरच करणार भाजप प्रवेश करतील. विरोधकांना नेहमीच जातीच राजकारण दिसतं, असेही पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा