सोलापूर : सोलापूर मगापालिकेतील सत्ताधाºयांच्या अनागोंदी कारभार विरोधात १ ते ८ झोन कार्यालयास टाळे ठोकून झोन कार्यालयासमोर सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने निदर्शने करण्यात आले.
यावेळी भाजपच्या विरोधात भाजप हटाव सोलापूर बचाव, रोज स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहीजे, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अश्या जोरजोरात घोषणाबाजी मूळे झोन आॅफिस दणाणून गेले होते.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, सोलापुर महापालकेतील सत्ताधारी भाजपचा अनागोंदी कारभार चालू असून सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी गटबाजीत व्यस्त आहेत़ यामुळे सोलापूरच्या नागरिकांचे हाल होत आहेत म्हणून सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी च्या विरोधात तसेच ५ दिवसावाढ, पाणी टंचाई, दूषित पाणीपुरवठा, रात्री अपरात्री पाणीपुरवठा, नालेसफाई, गटारीची समस्या, ड्रेनेजची सफाई, आरोग्य सुविधा, कचरा समस्या, रस्ते, दिवाबत्ती, प्रभाग समितीची स्थापना नाही, अपुरा मनुष्यबळ आदी समस्या विरोधात सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने १ ते ८ झोन ला टाळे लावून झोन बंदी करून निदर्शने करण्यात आले.
या निदर्शने आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेता चेतन नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, परवीन इनामदार, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, सुदीप लोकसभा अध्यक्ष चाकोते, शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नलिनीताई चंदेले, मेघनाथ येमुल, दत्तू बंदपट्टे, जेम्स जंगम, सैफन शेख, शौकत पठाण, राहुल वर्धा, केशव इंगळे, माणिकसिंग मैनावाले, तिरुपती परकीपंडला, शशिकांत जाधव, मनीष गडदे, युवराज जाधव, संजय गायकवाड, महेश घाडगे, सुमन जाधव, अशोक कलशेट्टी, मन्सूर गांधी, कोमोरो सय्यद, शाहू सलगर, रियाज मोमीन, डॉ अप्पासाहेब बगले, श्ऊ गायकवाड, उपेंद्र ठाकर, अशोक मादगुंडी, प्रमिला तुपलावंडे, कमरुणीसा बागवान, पृथ्वीराज नरोटे, लता सोनकांबळे, रमेश फुले, नूर अहमद नालवार, रेवनसिद्ध आवजे, श्रीकांत गायकवाड, विकास शिंदे, रफिक इनामदार, संतोष सोनवणे, कानुल मौलाना, सुदामा सय्यद, हारून पठाण संभाजी गायकवाड, नारायण माने, किरण घाडगे, विष्णू यमगर, श्रीधर काटकर, नागनाथ कासलोळकर, विवेक खन्ना, बसवराज म्हेत्रे, शिल्पा चांदणे, अरुणा वर्मा, अनिल मस्के, शोभा बोबे, साई करगुळे, महेश गायकवाड, मनोज चवरे, इसाक पुढारी, शकुर शेख, श्रीकांत दासरी, मल्लिनाथ सोलापुरे, रजनी अच्चूगटला, नागनाथ निंबाळकर, श्रीकांत पवार, देवेंद्र सैनसाखळे, सचिन व्होटकर, जाकीर मणियार, बाळू मिसाळ, भाग्यश्री कदम, अमिता जबडे, लता गुंडला, भारत शिंदे, हुमायू इनामदार, संजय कुचेकर, निशिगंधा कुचेकर, लक्ष्मी चव्हाण, करीम शेख, प्रनोती जाधव, मुमताज तांबोळी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्ठया संख्येने उपस्थित होते.