मोदी-आदानी भ्रष्टाचारसंबंधी प्रश्न विचारण्यासाठी सोलापुरातून काँग्रेसने पाठविली पाच हजार पोस्टकार्ड

By Appasaheb.patil | Published: April 3, 2023 03:49 PM2023-04-03T15:49:21+5:302023-04-03T15:50:00+5:30

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आली आहे.

congress sent 5000 postcards from solapur to ask questions regarding pm modi adani corruption | मोदी-आदानी भ्रष्टाचारसंबंधी प्रश्न विचारण्यासाठी सोलापुरातून काँग्रेसने पाठविली पाच हजार पोस्टकार्ड

मोदी-आदानी भ्रष्टाचारसंबंधी प्रश्न विचारण्यासाठी सोलापुरातून काँग्रेसने पाठविली पाच हजार पोस्टकार्ड

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई व मोदी - आदानी भ्रष्टाचार संबंधी प्रश्न विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच हजार पोस्ट कार्ड पाठवून मोहिम शुभारंभ मुख्य पोस्ट कार्यालय, रेल्वे टेशन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे व युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आलेले आहे. आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने पोस्टकार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध प्रश्न विचारून उत्तर देण्यासाठी पोस्ट कार्ड पाठवण्यात आले या पोस्ट कार्ड मध्ये राहुल गांधी यांच्यावर केलेल्या अन्यापूर्वक कारवाईवरील प्रश्न व मोदी आदानी यांच्यातील भ्रष्टाचारातील संबंध यावर विविध प्रश्न पाठवण्यात आलेले आहे.

आमदार प्रणिती शिंदे आपल्या मनोगत बोलताना म्हणाले देशाची वाटचाल हुकूमशाही कडे चालू आहे. राहुल गांधी वरील केलेली कारवाई लोकशाही विरोधी आहे. आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आज पोस्ट कार्ड आम्ही पंतप्रधानास पाठवित आहे ते मध्येच गहाळ होईल. या पोस्ट कार्ड मधून पंतप्रधानास प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे ते म्हणाले असेही त्या म्हणाल्या. यावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव, ओमकार गायकवाड, विश्वराज चाकोते, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, सुमित गडगी, प्रवीण वाले, प्रतीक आबुटे, राजासाहेब शेख, शरद गुमटे, अनिल जाधव, युवराज जाधव आदी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: congress sent 5000 postcards from solapur to ask questions regarding pm modi adani corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.