राकेश कदम, सोलापूर: शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी महापालिकेवर हलगीनाद करीत जनआक्रोश मोर्चा काढला. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
चार हुतात्मा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. काँग्रेसचे युवक, महिला पदाधिकारी यात सहभागी झाले होते. सोलापूर शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेतून करवाढ सुरू आहे. शहरातील कचरा उचलला जात नाही असा विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे व काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर समस्यांचे तोरण बांधले. राज्यात शिंदे फडणीस यांचे सरकार आहे. या सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. त्यामुळे शहराचे वाटोळे होत आहे, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. सरकारने राज्यातील महापालिकांची निवडणूक घ्यावी अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली.