मोदी लाटेने संपूर्ण देशात भाजपाला तारले असून, त्यास सोलापूरही अपवाद राहिले नाही. या लाटेने संपूर्ण देशभरात काँग्रेसची पीछेहाट होऊन पक्षाचा मतांचा टक्का घसरला आहे. सोलापुरात २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत १३.४५ ने घट झाली आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसने बाजी मारली असली तरी २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत या खेपेस राष्टÑवादीच्या मतांमध्ये १२.५० टक्क्यांनी घट झाली आहे.गत निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदारजागृतीमुळे मतांचा टक्का तसा वाढला आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना लाखांच्या पटीत मते मिळाली आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी ९९ हजार ६३२ मतांनी विजय मिळविला होता. या निवडणुकीत शिंदे यांना ३ लाख ८७ हजार ५९१ तर भाजपाचे अॅड. शरद बनसोडे यांना २ लाख ८७ हजार ९५९ मते मिळाली होती. पक्ष कामगिरीत काँग्रेसला ५२.१४ टक्के, भाजपाला ३८.७३ टक्के तर इतरांना १०.०३ टक्के इतकी मते मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला. शिंदे यांना ३ लाख ६८ हजार २०५ इतकी मते मिळाली. २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांना या निवडणुकीत १९ हजार ५८६ मते कमी मिळाली. पक्षाच्या कामगिरीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ३८.६९ इतकी आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी १३.४५ टक्क्यांनी घटली आहे. भाजपाचे अॅड. शरद बनसोडे यांना २००९ च्या निवडणुकीत २ लाख ८७ हजार ९५९ इतकी मते मिळाली. त्यांचा ९९ हजार ६३२ मतांनी पराभव झाला. पक्ष कामगिरीत भाजपाला ३८.७३ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत बनसोडे यांना ५ लाख १७ हजार ८७९ मते मिळाली. त्यांनी शिंदे यांचा तब्बल १ लाख ४९ हजार ६७४ मतांनी पराभव करुन इतिहास घडविला आहे. या खेपेस पक्ष कामगिरीत भाजपा सरस ठरली आहे. २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला ३८.७३ टक्के इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपाला ५४.७२ टक्के मते मिळाली. गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या मतांमध्ये या खेपेस १५.९९ टक्के मतांनी वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेसपेक्षा भाजपाची कामगिरी या निवडणुकीत उल्लेखनीय दिसून येते. भाजपच्या या टक्का वाढीत मोदी लाटेचा मोठा प्रभाव आहे. माढा लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत राष्टÑवादीचे शरद पवार यांना ५ लाख ३० हजार ५९६ इतकी मते मिळाली होती. त्यांनी भाजपाचे सुभाष देशमुख यांचा तब्बल ३ लाख १४ हजार ४५९ मतांनी पराभव केला. त्या निवडणुकीत देशमुख यांना २ लाख १६ हजार १३७ इतकी मते मिळाली होती. पक्ष कामगिरीत राष्टÑवादीला ५७.८६ टक्के मते मिळाली. तर भाजपाला २३.५० टक्के मते मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील यांना ४ लाख ८९ हजार ९८९ इतकी मते मिळाली. त्यांनी महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा २५ हजार ३४४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांना ४ लाख ६४ हजार ६४५ मते मिळाली. २००९ च्या निवडणुकीत भाजपाचे सुभाष देशमुख यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत सदाभाऊ खोत यांनी २ लाख ४८ हजार ५०८ मते अधिक मिळविली आहेत. पक्ष कामगिरीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४५.३६ टक्के तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ४३.०५ टक्के मते मिळाली आहेत. इतरांना १८.६४ टक्के मते मिळाली आहेत. २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत राष्टÑवादी काँग्रेसला १२.५० टक्के मते कमी मिळाली आहेत. या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चांगली मते मिळविली असल्याने २००९ ला भाजपाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत १९.५५ टक्के मते त्यांना अधिक मिळाली आहेत. एकंदरच सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या मतांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे सोलापुरात भाजपच्या मताचा टक्का वाढल्याने त्यांच्यात जोष निर्माण झाला आहे. माढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या मतांपेक्षा अधिकपटीने मते मिळवून आपली ताकद दाखवून दिली आहे.
-----------------
काँग्रेसने आत्मचिंतन करावे
सोलापूर लोकसभेसाठी आजवर झालेल्या १७ निवडणुकीत भाजपाने तीन वेळा विजय मिळविला होता. ४आता २०१४ च्या निवडणुकीतही विजय मिळविल्याने भाजपाचा हा चौथा विजय झाला आहे. ४२००४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उज्ज्वलाताई शिंदे यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. ४या खेपेस दस्तुरखुद्द सुशीलकुमार शिंदे यांना दीड लाख मतांनी पराभव पत्करावा लागला आहे. ४शिंदे यांची केंद्रात सोलापूरचा कर्तृत्ववान चेहरा म्हणून ओळख आहे. ४त्यांना पराभव पत्करावा लागल्याने तो त्यांच्या जिव्हारी लागला आहे. ४कुणी काय केले, याचे पाढे वाचत बसण्यापेक्षा काँग्रेसच्या स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करावे, इतकेच.
----------------------------
माढ्यात विजयसिंहांनी राखली शान ४माढा लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवून या मतदारसंघातील शरद पवारांची प्रतिष्ठा जपली आहे. ४२००९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे मोहिते-पाटील हे एक पाऊल मागे पडले होते. ४याला कारण त्यांनीच मोठे केलेल्या जिल्ह्यातील नेत्यांचे होते. पण शरद पवारांनी मनावर घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि पक्षांतर्गत नाराजी असूनही मतदारांनी त्यांना थेट संसदेत पाठविले. ४ माढा लोकसभा मतदारसंघातील विजयामुळे विजयसिंहांनी स्वत:बरोबरच शरद पवारांचीही शान राखली आहे. ४ विजयसिंह यांना भाऊबंदकीचा फटका बसेल असे वाटत होते. पण प्रतापसिंह मोहिेते-पाटील यांना २५ हजाराच्या पुढे मजल मारता आली नाही.
-------------------- कामगिरी पक्षांची शंकर जाधव----------------