माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:01 PM2024-10-23T12:01:30+5:302024-10-23T12:01:57+5:30

सर्व विषयांवर चर्चा झाल्यानंतर दोन्ही मोठ्या नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार पवार गटाकडून लवकरच यादी जाहीर होणार आहे.

Consensus between Sharad Pawar and Vijaysinh Mohite Patil regarding the candidate for Madha Assembly Constituency | माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!

माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!

Madha Vidhan Sabha ( Marathi News ) : माढा, पंढरपूर आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघांतून कोणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात झाल्याची चर्चा आहे. उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत. माढ्यात पवार गटाकडून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय कोकाटे, संजय पाटील-घाटणेकर आणि अभिजित पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मोहोळमधून संजय क्षीरसागर आणि राजू खरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांच्याही नावाची चर्चा आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, मोहिते-पाटलांनी जिल्ह्यातील वातावरणाचा अंदाज दिला. एका खासगी कंपनीमार्फत झालेल्या सर्वेक्षणाचाही पवार गटाकडून अंदाज देण्यात आला. या सर्व विषयांवर चर्चा झाल्यानंतर दोन्ही मोठ्या नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार पवार गटाकडून लवकरच यादी जाहीर होणार आहे.

महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!

विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव शिंदे अजित पवार गटाचे असले तरी ते महायुतीकडून न लढता शरद पवार यांच्याकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीला उमेदवार न मिळाल्यास पंढरपूरच्या कल्याणराव काळे यांच्या नावाची महायुतीकडून चाचपणी सुरू असल्याचे चित्र आहे. लोकसभा निकालानंतर पंढरपूर मंगळवेढ्यातून विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अभिजित पाटलांनी आपला मोर्चा माढ्यात वळविला. 

भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला आहे. त्यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपची आमदारकी सोडण्याची तयारीही दर्शविली आहे. आता पंढरपूरच्या सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू झाल्याचे सांगण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे आमदार बबनराव शिंदे विरुद्ध कल्याणराव काळे असा सामना पाहावयास मिळू शकतो.

Web Title: Consensus between Sharad Pawar and Vijaysinh Mohite Patil regarding the candidate for Madha Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.