प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत पहिल्या बाळंतपणाच्या वेळी गरोदर मातांना ऑनलाइन पद्धतीने तीन टप्प्यांत एकूण पाच हजार रुपये दिले जातात. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारी अर्थकारण ढासळले आहे. त्यामुळे या काळात मातांना मिळणारी मदत मोठा आर्थिक दिलासा देणारी ठरली आहे. मात्र, या योजना तळागाळापर्यंत पोहोचविताना आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचा यामध्ये सिंहाचा वाटा ठरला आहे.
........
असा मिळाला लाभ
१ ते ७ सप्टेंबर या दरम्यान मातृवंदना योजना सप्ताह साजरा केला. यामध्ये आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६६२ गरोदर मातांची नोंद करून, त्यांना लाभ मिळवून दिला. २०१७ पासून आरोग्य विभागाने ११ हजार ९७८ मातांची ऑनलाइन नोंदणी झाली असून, मातांना ४ कोटी ९० लाख रुपयांचा लाभ मिळाला.
................
ही योजना अत्यंत सुलभ आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मातांना लाभ घेता आला, याशिवाय योजना राबविताना वरिष्ठ अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांसह पंचायत समितीतील पदाधिकारी आदींचे मोठे सहकार्य लाभले.
-डॉ.रामचंद्र मोहिते, तालुका वैद्यकीय अधिकारी, माळशिरस.