शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

अटक न करता सोडून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी हवालदारास अटक; खासगी व्यक्तीवरही गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Published: June 27, 2024 7:02 PM

ॲन्टी करप्शनच्या पथकाने पडताळणी करुन ही कारवाई केली. 

सोलापूर : पोलीस ठाण्यात आयपीसी ३२५ च्या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करुन सोडून देण्यासाठी खासगी व्यक्तीकरवी १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हवालदारासह दोघांना अटक करण्यात आली. ॲन्टी करप्शनच्या पथकाने पडताळणी करुन ही कारवाई केली. 

किरण देवीदास म्हेत्रे (वय- ४६, हवालदार, अरविंद धाम पोलीस वसाहत, सोलापूर) आणि रोहित नागेश गवड (वय ३३, रा. द. कसबा, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम, ७, ७ अ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यातील तक्रारदार व त्याच्या मामेभावाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात आयपीसी ३२५ अन्ये गुन्हा दाखल असल्याचे नमूद हवालदार म्हेत्रे यांनी त्याला सांगितले. या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करुन सोडून देतो, यासाठी खासगी इसमाकरवी २५ हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडीअंती ही रक्कम १० हजार रुपयांवर आणली गेली. यानंतर तक्रारदाराने लाच लुुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयालयाकडे संर्प र्क साधून तक्रार देण्यात आली. पथकाकडून २४ जून रोजी पडताळणी करण्यात आली, त्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावण्यात आला. २६ जूनच्या रात्री उशिरानंतर नमूद लोकसेवक हवालदार या सापळ्यात अलगद अडकला. पथकाकडून शहानिशा केली असता हवालदाराने लाच स्वीकारल्याची मान्य केले. सदरची लाच खासगी इसमाच्या हस्ते स्वीकारली असल्याने दोघांना ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डा. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, हवालदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, रवी हाटखिळे, राहूल गायकवाड यांनी पार पाडली.

.. तर थेट तक्रार कराकोणत्याची कामासाठी पैसा घेणे हे कायद्यानुसार गुन्हा ठरतो. अशा प्रकारे लाच मागितल्यास संबंधी लोकसेवक अथवा त्याच्या वतीने लाच मागणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री नं. १०६४ अथवा ०२१७ - २३१२६६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केले आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग