ते शिवसंपर्क अभियानांतर्गत आयोजित बैठकीत बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, भाऊसाहेब आंधळकर, सुधीर सोपल, शहराध्यक्ष दीपक आंधळकर, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, आबाजी पवार, माजी नगराध्यक्षा मंगल शेळवणे, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, गणेश जाधव, युवानेते आर्यन सोपल, नगरसेविका वर्षा रसाळ, वाहेद शेख, पृथ्वीराज रजपूत, अरुण येळे, सुनीता जाधव, अरुणा परांजपे, मनीषा नान्नजकर, कल्याणी बुडूख, आबेद सय्यद, नागजी नान्नजकर, बाबूराव जाधव, महेश यादव, गणेश नान्नजकर, विशाल वाणी, श्रीकांत शिंदे, दत्ता शिंदे उपस्थित होते.
सोपल पुढे म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधानांनी अचानक कडक लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांना अडचण निर्माण झाली. अशा भांबावलेल्या लोकांना मनापासून धीर देण्याचे, वेळोवेळी मदत करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळाने मोठ्या प्रमाणात केले. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे आपण मागणी करून आरोग्य उपकेंद्राची मागणी केली; परंतु ज्यांचा या शासनाचा संबंध नाही ते म्हणतात आम्ही केले. ग्रामीण रुग्णालयासाठी मागणीचे माझे पत्र, माझ्या नावाचा उल्लेख कागदपत्रांतून पाहता येईल; परंतु त्याचे श्रेय घेण्याचे केविलवाने प्रयत्न विरोधक करत असल्याचे सोपल यावेळी म्हणाले.
गणेश वानकर म्हणाले, जिल्ह्यातील संपर्क अभियानात हा चौथा तालुका आहे. शिवसेनावाढीसाठी ज्यांना संधी द्यायची त्यांना ती देऊ. शिवसेनेच्या विचारांची नगर परिषद निवडून दिल्यास माेठा निधी खेचून आणू.
भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, शेतकरी कर्जमाफीप्रमाणे महिला बचत गटांची कर्जमाफी करावी आणि स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महिला बँक सुरू करावी ही मागणी आपण केली आहे.
राजाभाऊ काकडे यांनी प्रास्ताविक केले, प्रशांत घोडके यांनी सूत्रसंचालन केले.
---
मी लवकरच कॅबीनेट मंत्री : भाऊसाहेब आंधळकर
मी लवकरच कॅबिनेट मंत्री किंवा महामंडळाचा अध्यक्ष होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी आपला थेट संपर्क आहे, असे सूतोवाच करत बार्शीच्या राजकारणात मी सोपल आणि मिरगणे एकत्रच आहोत. आज केवळ पक्षाचा कार्यक्रम असल्याने मिरगणे येऊ शकले नाहीत. असे भाऊसाहेब आंधळकर यांनी स्पष्ट केले.
---