येथील जि.प.चा प्राथमिक शाळेने जागर स्वच्छतेचा व गाव कोरोनामुक्तता या पार्श्वभूमीवर वर्गशिक्षिका शकुंतला पालखे यांच्या संकल्पनेतून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी उपचारापेक्षा प्रतिबंध हाच योग्य उपाय, म्हणून मुख्याध्यापक कृष्णात आळगडे, शकुंतला दळवी, कल्पना पारखी या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून 'माझे गाव कोरोनामुक्त गाव' हे अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत या बालचमूनेदेखील आपला उल्लेखनीय सहभाग नोंदवीत मोबाइलच्या माध्यमातून कोरोना जागृतीपर संदेश देणारे व्हिडिओ, गाणी, संवाद यांच्याद्वारे गावात जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.
आपल्या घरापासूनच स्वच्छतेच्या सवयी व कोरोनाविषयी गोष्टीचे पालन करण्याची माहिती आपल्या बालभाषेत देऊन आजी-आजोबांना लस घेण्याचा आग्रह करताना दिसत आहेत. गटविकास अधिकारी साधना काकडे यांनी त्यांचा सन्मान करून कौतुक केले.
०५ वैराग
दहिटणे( ता. बार्शी ) येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना 'कोरोना योद्ध्याचा सन्मान देऊन गौरविताना गटशिक्षणाधिकारी साधना काकडे.