गेल्या वर्षी कोरोनाची दाहकता कमी असली तरी बीबीदारफळच्या चार व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यामध्ये चाळिशीतील दोन युवक दगावले. यावर्षी एप्रिल- मे महिन्यात दगावलेल्या २१ मध्ये सहा तरुण वयाच्या चाळिशीच्या आसपासचे आहेत. शेजारच्या रानमसले गावात कोरोनाची शिकार ठरलेल्यामध्ये चार- पाचजण तरुण आहेत. एक तर २८ वर्षांची महिला आहे. अकोलेकाटीत दगावलेल्या सात जणांमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे.
आरोग्य खात्याकडे ४० वयोमान असलेल्या व कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १८ इतकीच असली तरी प्रत्यक्षात २५ पेक्षा अधिक युवकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी काही साखर कारखाना, शेती, स्वतःचा व्यवसाय व खासगी कंपनीत काम करीत होते.
सजग वडाळा गाव...
गत वर्षभरात वडाळा गावात सतत तपासण्यांवर भर दिला जातो. याचा फायदा मृत्यू रोखण्यासाठी झाला आहे. तालुक्यात वडाळ्यात सर्वाधिक २४५ पॉझिटिव्ह निघाले असले तरी मृत्यू मात्र चौघांचा झाला आहे. सतत तपासण्या करून घेत असल्याने लगेच क्वारंटाइन सेंटरला किंवा उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याने वेळेत उपचार होतो. त्यामुळे वडाळ्यात पॉझिटिव्ह संख्या मोठी दिसत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. याउलट बीबीदारफळ, रानमसले, अकोलेकाटी, कौठाळी, कवठे गावचे आहे.
----
कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींची तत्काळ तपासणी केली जाते. पॉझिटिव्ह निघालेल्यांवर उपचार व त्यांच्या
कुटुंबातील व संपर्कातील
व्यक्तींची त्याचदिवशी
टेस्ट घेतली जाते. त्यामुळे वडाळ्यात मृत्यूचे प्रमाण कमी आहे. पॉझिटिव्ह संख्या वाढत असली तरी मृत्यूपासून वाचविणे महत्त्वाचे आहे.
- जितेंद्र साठे
सरपंच, वडाळा