सोलापूर : सोलापूर शहराबरोबरच आता ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात एकच नवा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यांत एकही रुग्ण नाही, तर पंढरपूर तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक १६ रुग्ण आहेत. नव्या रुग्णामध्ये महिलेचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या अशी- अक्कलकाेट १, बार्शी १, करमाळा १, माढा २, माळशिरस ३, मंगळवेढा १, मोहोळ १, पंढरपूर १६, सांगोला ५ अशा एकूण ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या १ लाख ८७ हजार ४९६, आजपर्यंत मृतांची संख्या ३ हजार ७३१ तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची संख्या ३१ एवढी आहे.आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या १ लाख ८३ हजार ७३४ एवढी आहे.