सोलापूर : जिल्ह्याला रासायनिक खताचा पुरवठा करणाºया गोव्याच्या कंपनीतील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याने मागणीप्रमाणे खताची उपलब्धता होत नसून रासायनिक खताची टंचाई निर्माण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी दिली.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी आवश्यक असणाºया खताचा पुरवठा करण्याबाबत कृषी विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला. कृषीमंत्री दादा भुसे हे सोलापूर दौºयावर आल्यानंतर त्यांना जादा खत पुरवठा करण्याबाबत मागणी करण्यात आली. त्यांनी ही मागणी मान्य करीत ५ हजार टन अतिरिक्त खताचा पुरवठा करण्यास मंजुरी दिली. त्याप्रमाणे संबंधित कंपनीकडे खताची मागणी नोंदविली. गेल्या आठवड्यात रेल्वेद्वारे सोलापूरसाठी अडीच हजार टन खत येणे अपेक्षित होते. पण खत पुरवठा करणाºया गोव्यातील कंपनीमध्ये कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. काम बंद झाल्याने खताचा पुरवठा होऊ शकला नाही. याबाबत पाठपुरावा सुरू असून, येत्या आठवड्यात अडीच हजार टन खत उपलब्ध होईल. शेतकºयांनी खत खरेदीसाठी गर्दी न करता प्रतीक्षा करावी.
सध्या पाऊस सुरू आहे. अशात खताची मात्रा देणे उपयोगाचे नाही. केवळ भविष्यात खत मिळेल की नाही म्हणून खत नेण्यासाठी गर्दी करू नये. पुढील आठवड्यात पाच हजार टन खत उपलब्ध झाल्यावर अडचण येणार नाही, असे बिराजदार यांनी सांगितले.
जादा दराने खताची विक्री
- - खताच्या टंचाईचा फायदा घेत दुकानदार एमआरपीपेक्षा जादा दराने खतविक्री करीत आहेत. आहेरवाडीतील दुकानदाराने शेतकºयाकडून जादा पैसे घेतल्याची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
- - इतर कामांसाठी मोबाईल अॅपचा वापर होत आहे. त्याप्रमाणे खत विक्रीसाठी ही सोय करावी यामुळे बोगसगिरी होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.