शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामुळे या लढ्यात पुन्हा पोलिसांची भूमिका निर्णायक ठरत आहे.
शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील विविध व्यापरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी नियमाचे पालन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय पोलिसांनी २६ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत विनामास्क फिरणाऱ्या १४७ लोकांवर कारवाई करत ७१ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोनि दीपरतन गायकवााड यांनी केले आहे.