शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला ‘कोरोना’ची लागण; सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:10 AM

३१८ कैद्यांसह ६० कर्मचाºयांची होणार तपासणी;  कारागृह अधीक्षकांनी केली महापालिकेकडे मागणी

ठळक मुद्देजेलमध्ये कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात होतीसोलापुरात जबरी चोरी केल्याप्रकरणी एकाला सदर बझार पोलिसांनी अटक केली होतीदोन महिन्यापूर्वीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी तो कारागृहात आला होता

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याला कोरोनाची बाधा झाली आहे  त्यामुळे आतील ३१८ जणांची व ६० कर्मचाºयांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी महापालिकेच्या आरोग्याधिकाºयाकडे अधीक्षक डी.एस. इगवे यांनी केली आहे.

जिल्हा कारागृहात सुमारे ४७५ न्यायाधीन कैदी होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेत अटक असलेल्या न्यायाधीन कैद्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. आदेशावरून कारागृह अधीक्षकांनी सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या जेलमधील ७० न्यायाधीन कैद्यांना ४५ दिवसांच्या रजेवर सोडले आहे. प्रादुर्भाव वाढल्यास पुढे आणखी ३० दिवसांची वाढ करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जेलमध्ये कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात होती.

मार्च महिन्यात एकाला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. गेल्या चार दिवसापर्यंत तो व्यवस्थित होता; मात्र त्याला अचानक ताप येण्यास सुरुवात झाली. कैद्याला ताप येत असल्याचे पाहून तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी कैद्याचा स्वॅब घेण्यात आला, रविवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कैद्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच खळबळ उडाली. दरम्यानच्या काळात तो कैदी अन्य किती जणांच्या संपर्कात आला होता. कर्मचारी संपर्कात आले होते का? याची माहिती घेण्यात येत आहे.

कारागृहातील अन्य लोकांना याची बाधा होऊ नये म्हणून अधीक्षक डी.एस. इगवे यांनी सोमवारी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांना तपासणी करण्याची मागणी केली आहे. कारागृहात सध्या ३१८ कैदी असून, ६0 कर्मचारी आहेत. सर्वांची तपासणी करण्यात यावी अशी विनंती केली आहे. मागणीनुसार मंगळवारपासून तपासणी होणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी आलेल्या कैद्याला बाधा कशी ?- सोलापुरात जबरी चोरी केल्याप्रकरणी एकाला सदर बझार पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला न्यायालयाने कोठडी दिली होती. कोठडीनंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. दोन महिन्यापूर्वीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी तो कारागृहात आला होता. सध्या कारागृहात गंभीर गुन्ह्यातील आरोपीशिवाय नवीन कैद्याला घेतले जात नाही. यापूर्वी तर कारागृहात कोणालाही कोरोनाची लागण झाली नव्हती. असे असताना अचानक एका कैद्याला ताप आला आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? असा प्रश्न कारागृह प्रशासनाला पडला आहे.

कारागृहात पहिल्यापासून खूप काळजी घेतली जात आहे. आतमध्येही फिजिकल डिस्टन्स पाळला जात आहे. स्वच्छता पाळली जाते, असे असताना दोन महिन्यांपूर्वी कारागृहात आलेल्या न्यायाधीन कैद्याला कोरोनाची बाधा झाली कशी ? हे समजत नाही. याबाबत आम्ही सखोल माहिती घेत आहोत.- डी. एस. इगवे, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी