या प्रसंगी बाल वारकरी यांनी पालखीमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती बसवून बाल विठू माउली व बाल वारकऱ्यांनी नागरिकांना मास्क देऊन ‘मास्क वापरा, कोरोना टाळा’ असे घोषवाक्य देऊन कोरोना निर्मूलनासाठी जनजागृती केली. दिंडीचे विठ्ठल मंदिर येथे समारोपावेळी बाल वारकरी यांनी फुगड्या खेळून वातावरणात चैतन्य निर्माण केले व मास्क वापरा, सर्वांनी लसीकरण करा, असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले.
या दिंडीमध्ये बाल विठ्ठल म्हणून स्वराज गायकवाड, रुक्मिणी म्हणून लक्ष्मी बनसोडे, संत तुकारामाच्या वेशात शौर्य गायकवाड, सई गायकवाड, वैष्णवी सुरवसे, ओम कुर्हे, अभिज्ञा कारंडे, साक्षी, सिया मनसुके, शंभू गायकवाड, रुद्र ननवरे, रुद्र कुर्हे, समर्थ गायकवाड आदी बाल वारकरी उपस्थित होते.
---
फोटो : २० करमाळा बालदिंडी
करमाळा शहरातील किल्ला विभाग येथे आषाढी एकादशीनिमित्त कोरोना जनजागृती बालदिंडीत सहभागी बाल वारकरी इतर.