सोलापूर : सोलापुरात 'कोरोना' बाधितांची संख्या वाढतच आहे. रविवार दिवसभरात १८ पॉझिटिव्ह रूग्ण वाढले असून एकूण संख्या ५८३ इतकी झाली आहे तर मृतांची संख्या ५१ वर पोहोचली आहे.
दरम्यान, आजपर्यंत एकूण ५७७० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील ५५४३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ४९६० निगेटिव्ह तर ५८३ पॉझिटिव्ह आहेत तर २२७ अहवाल प्रतिक्षेत आहेत.
आज एका दिवसात १२० अहवाल प्राप्त झाले यापैकी १०२ निगेटिव्ह तर १८ पॉझिटिव्ह आहेत. आज ५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे तर ५ जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं.
आत्तापर्यंत बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या २५४ असून २७८ जणांवर उपचार सुरू आहेत. यात १४३ पुरूष आणि १३५ महिलांचा समावेश आहे.
आज जे ५ जण मृत पावले ते पुढीलप्रमाणे -
- ८० वर्षीय पुरूष रा. कर्णिकनगर,
- ६५ वर्षीय महिला मिलिंद नगर बुधवार पेठ.
- ५६ वर्षीय महिला जुना विडी घरकुल.
- ७९ वर्षीय पुरूष शोभादेवी नगर नई जिंदगी.
- ६५ वर्षीय पुरूष सलगरवस्ती डोणगांव रोड.
आज रूग्ण मिळालेले विभाग पुढीलप्रमाणे -
- घोंगडेवस्ती भवानी पेठ १ पुरूष.
- शनिवार पेठ १ महिला.
- निलमनगर २ महिला.
- शास्त्री नगर १ पुरूष.
- रविवार पेठ १ पुरूष, १ महिला.
- सलगरवस्ती डोणगांव रोड १ पुरूष.
- दमाणीनगर १ महिला.
- गंगानगर १ महिला.
- न्यू पाच्छा पेठ २ पुरूष.
- मजरेवाडी १ पुरूष.
- एमआयडीसी रोड १ महिला.
- सबजेल १ पुरूष.
- मुळेगांव रोड १ महिला.
- वरद फार्म पुणे रोड १ पुरूष.
- पाच्छा पेठ १ पुरूष.