सोलापूर : शहरात बुधवारी सकाळी कोरोनाचे नवे ४० रुग्ण आढळून आले. यात महापालिकेच्या प्रमुख व त्यांचे पती आणि शहरातील एका आमदाराच्या बंधूचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेचे नगरसेवक आणि कर्मचारी हादरले आहेत.
शहरात ‘कोरोना’चे एक हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या २०० हून अधिक झाली आहे. महापालिकेचे तीन अधिकारी आणि १५ हून अधिक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. महपालिकेच्या प्रमुख पदाधिकाºयांना अंगदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांचे अहवाल आले. महापौर बंगल्यात कोरोना घुसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये आणखी अस्वस्थता पसरली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख चार दिवसांपूर्वीच व्कारंटाइन झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महापौर बंगला, देशमुख वाडा या परिसरात प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात येत आहे.