१२ एप्रिल रोजी दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून आभाळ भरून आले होते. साडेसहा वाजता वादळी वारा व विजेचा कडकडाट सुरू झाला. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकविलेल्या, हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष बागा अचानक आलेल्या अवकळी गारपिटीने जमीनदोस्त झाल्या आहेत. गारपिटीने झोडपल्याने सुस्ते, तुगंत, ईश्वर वठार, नारायण चिंचोली, बीटरगाव या भागांत वाऱ्याने आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या, डाळिंब, पपई, केळीच्या बागा पडल्या आहेत, तर वीटभट्टीचे लाखोचे नुकसान झाले आहे. जागोजागी रस्त्यावर मोठमोठी झाडे पडली आहेत. यामुळे सुस्ते परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
कोट :::::::::::::::::::
सुस्ते परिसरात झालेल्या गारपिटीने द्राक्ष व इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. शासनाने सरसकट पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी.
- आप्पा नागटिळक
द्राक्ष उत्पादक, सुस्ते
कोट ::::::::::::::::::::::
गेल्या वर्षी कोरोनामुळे द्राक्ष बागेला केलेला खर्च निघाला नव्हता. कवडीमोल दराने द्राक्ष विकली होती. त्यातूनच कर्ज काढून तीन एकर बागेला सहा लाख रुपये खर्च केला. द्राक्षाची काढणी सुरू असताना, अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने तीन एकर बाग जमीनदोस्त झाली आहे.
- नानासाहेब नागटिळक
द्राक्ष उत्पादक, सुस्ते.
कोट :::::::::::::::::::::
अचानक झालेल्या गारपिटीने वीटभट्टी फडात असलेला एक लाख कच्चा माल भिजून भुईसापट झाला आहे, तर एक लाख कच्च्या मालाची भट्टी धरली होती. तेही भिजल्याने गारपीटीने होत्याचं नव्हतं झालं आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
- दत्तात्रय बोबडे
वीटभट्टी मालक, सुस्ते