सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद येथील आणखी एका अधिकाºयाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या अधिकाºयांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाºयांचीही चाचणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले.
जिल्हा परिषदेतील एका अधिकाºयास त्रास होऊ लागल्याने शनिवारी रॅपिड अॅन्टिजनद्वारे टेस्ट करण्यात आली़ यामध्ये अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ त्यामुळे त्या अधिकाºयाची पुढील तपासणी रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले़ जिल्हा परिषदेतील सहाय्यक जिल्हाधिकारी, माता बाल संगोपन अधिकाºयास यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचाºयांची तपासणी करण्यात आली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना दोनवेळा कॉरनटाईन व्हावे लागले होते. आता ग्रामपंचायत विभागातील कर्मचाºयांवर चाचणी करण्याची वेळ येणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने याबाबत आता खबरदारी घेतली आहे़