नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नका म्हणून वारंवार सांगूनदेखील ते बाहेर पडताना दिसत आहेत. परिणामी बाधितांच्या संख्येचा आलेख वाढताना दिसत आहे. यावर पर्याय म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिवाजी चौकात नाकाबंदी करून व वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड यांच्या टीमने दोन दिवस रॅपिड अँटिजन चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये काही बाधितांना तात्काळ कोविड सेंटरला दाखल करण्यात आले आहे.
याकरिता ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे, सदाशिव पोलीस हवालदार गवळी नागेश, नाईकनवरे, अकाश कांबळे, आरोग्य टीममधील अतुल थोरात हेमंत पाटील, जगदीश ताकभाते, राहुल करंडे व होमगार्डचे सहकार्य लाभले.
---
फोटो १८ वैराग