प्रतिवर्षी कार्तिक पोर्णिमेदिवशी पंढरपूर येथून संत नामदेव महाराज आणि विठोबाच्या पादुका रथोत्सवातून आळंदी येथे पायी प्रस्थान ठेवतात. एकादशी व संजीवन समाधी सोहळा करुन परत अमावस्येला पंढरीत येतात. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे पायी सोहळा शक्य नाही.
या वीसजणांचा सहभाग
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे १५ लोक या पांडुरंगाच्या पादुका घेऊन सोहळ्यासाठी जाणार आहेत. यामध्ये ३ नित्योपचार करणारे कर्मचारी, ७ भजन-कीर्तन करणारे कर्मचारी, १ सुरक्षा रक्षक, २ नैवद्य तयार कर्मचारी, मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व ह.भ.प. जवजाळ महाराज व ह.भ.प. विठ्ठल वासकर महाराज यांच्या दिंडीतील ५ लोक असे एकूण २० जण जाणार आहेत.
सोहळ्यासाठी एसटी मोफत
श्री पांडुरंगाच्या पादुका एसटीने आळंदीकडे घेऊन जाण्यात येणार आहेत. त्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून कोणतेही मूल्य घेण्यात येणार नाही. एसटीची सजावट करुन ती १० डिसेंबरला मंदिर समितीच्या ताब्यात देणार असल्याचे आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.