उत्तर तालुक्यातील वडाळा, मार्डी व कोंडी येथे कोविड लसीकरण सुरू आहे. याशिवाय नव्याने ९ आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची सोय केली असल्याचे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले. बीबीदारफळ, गावडीदारफळ, कळमण, नान्नज, पाकणी, हिरज, बेलाटी, अकोलेकाटी व बाणेगाव या गावांतील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे.
आज ११ कोरोनाबाधित
उत्तर सोलापूर तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रविवार, दि. ४ एप्रिल रोजी तालुक्यात ९५० कोरोनाबाधित, सोमवार, ५ एप्रिल रोजी ९७३, तर मंगळवार, दि. ६ एप्रिल रोजी ९८४ कोरोनाबाधित आढळले. कळमण आरोग्य केंद्रांतर्गत गावात दोन दिवसांत २०, मार्डी आरोग्य केंद्रांतर्गत ८ व तिऱ्हे आरोग्य केंद्रांतर्गत गावात ६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.
----