वैराग: वैराग येथेे कोरोना काळात अहोरात्र कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या कोरोना योद्ध्यांचा सत्कार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निरंजन भूमकर यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र भोसले हे होते. कार्यक्रमास झेडपी सदस्य रेखा भूमकर, माजी जि. प. सदस्या तेजस्विनी मरोड, सरपंच सुजाता डोळसे, उपसरपंच संजय भूमकर, पं. स. सदस्या रंजना भालशंकर, शलाका मरोड, राजकुमार पौळ, विकास पाटील, भारत कासार, महिपती पांढरमिसे, रशीद शेख, शिवाजी हजारे, श्रीहरी मोहिते, मौलाना शेख, चंद्रकांत काटमोरे, महादेव ढोले, इंद्रजित पौळ, गिरजप्पा खरटमोल, रफिक बागवान, भारत रेड्डी, संतनाथ पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. (वा. प्र.)
फोटो
१२वैराग०१
वैराग येथे कोरोना योद्धांचा सत्कार करताना राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष निरंजन भूमकर व अन्य.