बसव जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ केला. कार्यक्रमास चंदन अडवितोट, रेवणसिद्ध दिकसंगी, विरेश कोळे, सिकंदर चाउस, संजय अडवितोट, धनराज शिंदे, राजशेखर पवार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, साहित्य व इतर खर्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिला जाईल. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याने ही मुले आयुष्यात स्वतःच्या पायावर उभी राहतील, असा विश्वास विरक्त मठाचे बसवलिंग महास्वामीजी यांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठीच्या कार्यकारी मंडळात प्रा. उमाकांत चनशेट्टी, राजू चनशेट्टी, काशूनाथ भतगुणकी, काशीनाथ गोळे, राजशेखर हिप्परगी, किरण पाटील, मल्लमा पसारे, सुचेता हिरेमठ, मनीषा माळशेट्टी, डॉ. बसवराज चिंणकेकर, प्रा. संतोष अगरखेड, हेमंत हिरेमठ, सिद्धय्या मठ, सोमनाथ माळशेट्टी, शिवानंद गोगाव, रामू समाणे यांचा समावेश आहे.
आई किंवा वडील गमावलेले व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे, पत्ता, संपर्कासाठी क्रमांक, तसेच जवळच्या तीन नातेवाइकांची नावे, पत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेलद्वारे कळविण्याचे आवाहन चनमल्लप्पा हौशेट्टी यांनी केले आहे.