सोलापूर : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे नव्याने चार रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांमद्ये घट झाली असून, गुरुवारच्या अहवालात ३१४ पॉझिटिव्ह तर ग्रामीणमध्ये तिघांचा बळी गेला आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने १४ हजार ८९० चाचण्यांचे अहवाल जाहीर केले. यात २९३ पॉझिटिव्ह तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्ती माळशिरसमधील उगडेवाडी, करमाळ्यातील करंजे व माढ्यातील उपळाई खु. येथील आहेत. पॉझिटिव्हची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ७७५ तर मृतांची संख्या ३ हजार २३ झाली आहे. १ लाख ३२ हजार ३५५ जण कोरोनामुक्त झाले असून, सध्या २ हजार ३९७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
मनपा आरोग्य विभागाने १ हजार ५३२ चाचण्यांचे अहवाल जाहीर केले. यात २१ जण पॉझिटिव्ह आले तर एकाचाही मृत्यू झालेला नाही. अशाप्रकारे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ हजार ६६५ तर, मृतांचा आकडा १ हजार ४०९ इतकाच आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७ हजार १६२ इतकी झाली असून, ९४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
म्युकरमायकोसिसमधून सहा जण बरे
म्युकरमायकोसिसचे गुरुवारी चार रुग्ण नव्याने आढळले तर एकाचा मृत्यू झाला. अशाप्रकारे एकूण बाधिताचा आकडा ५६९ तर मृताचा आकडा ७८ इतका झाला आहे. बुुधवारी सहा जण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१५ झाली आहे. सध्या ७६ रुग्ण उपचार घेत आहेत.