सोलापूर : इतके दिवस केवळ सोलापूर शहरात धुमाकूळ घालणारा 'कोरोना' आता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही घुसला आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी येथे एक सारीचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून आज दिवसभर नवीन नऊ रुग्णांची संख्या वाढली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी शनिवारी सायंकाळी दिली. अशाप्रकारे जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या एकूण 50 झाली आहे.
शहर व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. इतके दिवस शहरात धुमाकूळ घालणाºया या कोरोना विषाणूची भीती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना होती. मात्र अद्याप ग्रामीण परिसरात एकही रुग्ण आढळून न आल्यामुळे साºयांनीच निश्वास सोडला होता. मात्र शनिवारी एक रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. घेरडी येथील ३४ वर्षीय तरुणाला सारीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २४ एप्रिल रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने घेरडीचा तीन किलोमीटर परिसर सील केला असून पुढील सात किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषीत केला आहे.
विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य विभागाने यापूर्वी येळेगाव ते वांगी दरम्यानचा भाग सील केला आहे. येळेगाव येथील बेदाणा शेडवर काम करणारा कामगार मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे परतल्यावर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतली होती. त्या कामगाराच्या संपर्कातील शेडवरील इतर कामगारांना ताब्यात घेण्यात आले होते. पण सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. मुंबईहून मोहोळ तालुक्यात एका लग्नाला आलेल्या कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे कळविण्यात आले होते. या संबंधानेही जिल्हा आरोग्य विभागाने मोठी तपासणी मोहीम राबविली होती. पण आत्तापर्यंत एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळला नव्हता. पण आता घेरडीत रूग्ण आढळल्याने जिल्हा आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे. सोलापुरात शास्त्रीनगर, मोदीखाना, लष्कर येथील आठ रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत. यातील चौघांना सारी व चार जणांना कोरोनाची लाग झाली आहे.