सोलापूर : सोलापुरात कोरोनामुळे एका दुकानदाराचा मृत्यू झाला होता. यानंतर या दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 91 जणांचे स्वँब तपासण्यात आले. यातील 67 जणांचे हाती आले आहेत. यामध्ये खाजगी रुग्णालयातील एका महिला कर्मचाºयालाकोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. अद्याप चोवीस जणांचे अहवाल हाती येणे बाकी आहे.
कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे तेलंगी पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता. या दुकानदाराने गेल्या महिनाभरात बाहेरगावी प्रवास केला नसल्याचे कुटूंबीय सांगत होते. त्यामुळे त्यांना नेमकी कोणापासून कोरोनाची लागण झाली याचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले होते. त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णालयातील एका महिला कर्मचाºयाचा संपर्क आल्याने त्या महिला कर्मचाºयाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
आरोग्य विभागाने रविवारी रात्री तेलंगी पाच्छा पेठेकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. मृताचे कुटूंबीय, संपर्कात आलेल्या लोकांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी त्यांची तपासणी झाली. त्यापैकी 66 जणांचे रिपोर्ट आले असून त्यात एका नर्स महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.