सोलापूर : कोरोनाबाधितांना वाचविण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि अन्य काही जणांनी प्लाझ्मा थेरपीला प्रोत्साहन दिले आहे़ ही संघटना आणि शासकीय रुग्णालय यांच्या माध्यमातून कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा संकलित केले आहे़ मागील काही दिवसांत ४३ पिशव्या प्लाझ्मांचा साठा केला आहे.
१५ दिवसांत कोरोनातून बरे होऊन परतलेल्यांकडून प्लाझ्मा घेण्यासाठी संमतीपत्र भरून घेऊन चळवळ उभारली आहे़ आतापर्यंत महापौर श्रीकांचना यन्नम आणि महापालिकेचे सहआयुक्त धनराज पांडे यांच्यासह १५ लोकांनी स्वत: प्लाझ्मा देण्याला संमती दिली आहे़ तसेच भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विभागीय अध्यक्ष श्याम पाटील हे पहिले दानशूर पुढे आले़ तो प्लाझ्मा घेत असताना एका रक्ताच्या पिशवीवर दहा हजारांचे किट वापरले जात आहे.
कसे केले जाते प्लाझ्मा दान
- - कोरोनाबाधित व्यक्ती आजारातून बरी होऊन बाहेर पडते तेव्हा त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात़ कोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करता येतो.
- - असा दाता १८ ते ५५ वयोगटातील आहे का ते पाहिले जाते़ इतर आजार आणि व्यसन त्याला नसावेत.
- - दान करणाºया व्यक्तीच्या शरीरातून एकूण रक्तसाठ्यापैकी २५ टक्के रक्त घेतले जाते़ त्यावर प्रक्रिया करून प्लाझ्मा काढला जातो़ अशाप्रकारे त्याच्या शरीरातून चारवेळा रक्त काढून प्रक्रिया करून तेच रक्त पुन्हा त्याच्या शरीरात चढवले जाते.
- - हा प्लाझ्मा वर्षभर साठा करून ठेवला जातो़ गरज पडल्यास संबंधित रुग्णाला तो प्लाझ्मा दिला जातो.
सोलापुरात मागील काही दिवसांत ४३ लोकांचे प्लाझ्मा जमा केले आहेत़ मात्र त्याचा वापर करता येत नव्हता़ प्लाझ्मा वापरण्याबाबत नागपूर शासकीय रुग्णालयातील डॉ़ फैजल यांचे नियंत्रण आहे़ त्यांनी दोन दिवसांपूर्वी तो रुग्णासाठी वापरण्याला परवानगी दिली आहे़ या प्लाझ्मावर प्लॅटीना ट्रायल करून तो वापरात येणार आहे़ - डॉ. शुभलक्ष्मी जैयस्वाल प्रभारी अधिष्ठाता, शासकीय रु ग्णालय, सोलापूर
कोरोनातून बरे झालेल्या अनेकांशी संपर्क साधून भारतीय जैन संघटनेने प्लाझ्मा थेरपी समजावून सांगितली़ प्लाझ्मा माध्यमातून अनेकांचा जीव वाचवू शकतो़ या दानाबाबत जवळपास १५ जणांकडून संमतीपत्र घेतले आहे़ शहरातून ५०० आणि ग्रमीण भागातून ५०० पिशव्या प्लाझ्मा जमवणार आहे़ संपूर्ण राज्यात पाच हजार प्लाझ्मा जमा करणार आहोत़ - केतन शहा राज्य उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटना