शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 9:37 PM

रुग्ण कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा केला होता दावा; कॉलेज प्रशासनाने दिली पोलिसात तक्रार

ठळक मुद्देकोरूना वायरच्या या आजाराने जगभरात घातले थैमानराज्यातील अनेक शाळा महाविद्यालयांना दिली शासनाने सुट्टीकोरोना वायरस बाबत जनजागृतीसाठी प्रशासन सज्ज

पंढरपूर : कोरोनाची अफवा पसरवली व कॉलेजची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात स्वेरी कॉलेजचे प्रा. मुकुंद मारुती पवार यांनी शनिवारी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपुरातील विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरुन ' महाराष्ट्रात आणखी एक आढळला कोरोना रुग्ण’ स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता विद्यार्थी; संस्थेने फेटाळला सुट्टीचा अर्ज’ अशा आशयाचा मजकूर एका वृत्तवाहिनीच्या लोगोचा वापर करुन खोटी बातमी तयार केली.

स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकाने ती बातमी पाहिली. त्यानंतर त्या पालकाने कॉलेजमधील प्राध्यापकांना फोन करुन संबंधीत बातमीबाबत चौकशी केली. परंतु असा कोणताही प्रकार घडला नव्हता. त्यामुळे प्राध्यापकांनी घाबरु नका, असा प्रकार घडला नाही, असे सांगितले.

त्या बातमीद्वारे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. तसेच श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरी कॉलेज आॅफ इंजिनिअरींगची बदनामी केली म्हणून प्राध्यापक मुकुंद पवार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

------------------------------------------------दखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीचा शोध सायबर पोलिसांमार्फत घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आणखी कोणी अफवा पसरवल्यास त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- किरण अवचरपोलीस निरिक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरcorona virusकोरोनाCrime Newsगुन्हेगारी