पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सर्वसाधारण सभेत नगर परिषदेचे सन २०२०-२१ चे सुधारीत अंदाजपत्रक व सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी नगर परिषद यांनी सादर केले त्यास मान्यता देणे. यावेळी प्रशासन अधिकारी सुनील वाळूूजकर, नगर रचना अंभियंता नेताजी पवार, उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे व नगरसेवक उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेत सन २०२१-२२ चे
वार्षिक उत्पन्न प्रारंभिक शिलकेसह रू. १,६९,८०,७१,७६९/- असून वार्षिक खर्च रू.१,६९,७८,२८,९७७/-
इतका आहे. म्हणजेच वर्षाअखेरीस रू. २,४२,७९२/- इतकी शिल्लक राहील.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र लेखा संहिता
२०११ चे तरतुदीनुसार हे अंदाजपत्रक सादर केले. शासकीय परताव्याची (वार्षिक मुद्दल व त्यावरील व्याजाचे हप्ते) तरतूद केली आहे. चौदावा वित्त आयोग, पंधरावा वित्त आयोग वैशिट्ययपूर्ण योजना, विशेष
वैशिष्ठयपूर्ण योजना, नगरोत्थान (राज्य स्तर), नगरोत्थान (जिल्हा स्तर), रमाई आवास योजना, प्रधानमंत्री
आवास योजना, अग्निशमन सुरक्षा अभियान, यमाई तलाव सुशोभिकरण,प्राथमिक सोयी सुविधा विकास
योजना, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना, यांची तरतूद करणेत आली आहे.
शहरात नागरीकांना आवश्यक सुविधा पुरविणेसाठी रस्ते दुरूस्ती, नविन पाईप खरेदी, रस्ते बांधणी,
नविन गटारे, या कामांसाठी सन २०२०-२१ मध्ये व सन २०२१-२२ मध्ये भरीव तरतूद करणेत आलेली आहे.
तसेच शहर विकासासाठी नामसंकीर्तन सभागृह नाट्यगृहे बांधणे, उद्यान विकास करणे, पुतळ्यांची सुधारणा व
सुशोभिकरण करणे, घनकचरा प्रकल्प राबविणे, स्मशानभुमी सुधारणा करणे, वाहन खरेदी करणे इत्यादीसाठी
तरतूद करण्यात आलेली आहे.
फोटो : पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करताना नगराध्यक्षा साधना भोसले व नगरसेवक दगडु धोत्रे.