क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी असणाऱ्या महाळूंग ग्रामपंचायतीच्या परिसरात चार ते पाच मशानभूमी आहेत. काही स्मशानभूमीमध्ये
जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता तर नाहीच. श्रीपूरमधील स्मशानभूमीमध्ये तर रात्री अंधार असल्यामुळे प्रेत जाळताना नागरिकांचे खूप हाल होत आहेत.
या ठिकाणी सद्यस्थितीला प्रशासक नेमण्यात आला आहे.
महाळूंग ग्रामपंचायतीचे महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. सध्या नगर विकास
मंत्रालयाचे नियंत्रण आले आहे. आत्तापर्यंत ठोस अधिकारी देखील नेमण्यात
आला नाही. त्यामुळे सर्व परिसरातील नागरिकांमधून ताबडतोब श्रीपूर स्मशानभूमीसह परिसरातील इतर स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, रस्त्यांची सोय करावी, लाईट, पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याचे पडसाद येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीवर
मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
‘ब्रिमासागर’ने केली दिवाबत्तीची सोय
महाळूंग-श्रीपूरमधील स्मशानभूमीत गडद अंधार, मोबाइल टॉर्च लावून प्रेते जाळावी लागतात, याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यात मदत करणाऱ्या ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसलरीचे डायरेक्टर भरतकुमार सेठीया आणि जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर यांच्याशी झेडपी सदस्य अरुण तोडकर यांनी चर्चा केली. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत श्रीपूर स्मशानभूमीमध्ये ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टलरीतर्फे दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली.
कोट ::::::::::::::::::
सध्या महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे येथे प्रशासक आहे. येथे जिल्हा परिषदेचा निधी खर्च करता येत नाही. म्हणून मी संबंधित कारखान्याशी चर्चा करून दिवाबत्तीची सोय करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी रात्रीच दिवा बसविला आहे.
- अरूण तोडकर
झेडपी सदस्य