शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मतमोजणीदिवशी लहान इरण्णा वस्तीमध्ये असते अघोषित संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:54 PM

रामवाडी गोदामातील निवडणूक मतमोजणीचा दिवस : वाढत्या तापमानात कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे घरात बसणेही मुश्कील

ठळक मुद्देसकाळी सात वाजल्यापाून ते निकाल लागेपर्यंत येथील पोझिशन टाईट असतेगाडी बाहेर काढण्याच्या अडचणीमुळे मतमोजणीच्या दिवशी कामावर जात नाहीनिकालाच्या दिवशी वस्तीवर आजपर्यंत कधीही गोंधळ झाला नाही

संजय शिंदे

सोलापूर : मतमोजणीच्या दिवशी रामवाडी गोदामासमोरील लहान इरण्णा वस्तीमध्ये (मधुकर उपलप वस्ती) असते अघोषित संचारबंदी... समोरच्या बाजूने बांबूचे कठडे लावल्याने जे काही व्यवहार करायचे ते आतल्या आत... बाहेरच पडायचे तर अनेक बोळ पार करायचे... त्यातही गाडी बाहेर काढणे म्हणजे जणू परीक्षाच... एका बाजूला तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे तर दुसरीकडे विद्युत पुरवठा गोदामाकडे वळविल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे घरातील पंख्यांची गती मंदावलेली... या प्रतिक्रिया आहेत या वस्तीमध्ये राहणाºया नागरिकांच्या...

लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक असो वा महापालिकेची निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीची मतमोजणी ही सोलापुरातील रामवाडी गोदामातच होते आणि प्रत्येक मतमोजणीच्या वेळी जवळपास हेच चित्र असते. 

मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून गोदामासमोरील रस्त्यावर वाहनांना व नागरिकांना प्रवेशबंदी असल्यामुळे या रस्त्यावर फक्त बंदोबस्ताला असलेला पोलीस फौजफाटाच असतो. गेल्या दोन दिवसांपासून लहान इरण्णा वस्तीसमोर बांबूचे कठडे उभारण्याचे काम सुरू आहे. साडेतीन ते चार हजार लोकवस्ती असलेल्या या वस्तीवर बिगारी काम, मिस्त्री काम करणारे तसेच मोलमजुरी व घरगुती काम करणाºयांची संख्या ही जास्त आहे.

सकाळी सात वाजल्यापाून ते निकाल लागेपर्यंत येथील पोझिशन टाईट असते. त्यामुळे घराबाहेर पडणे अवघडच असते, असे येथे राहणारे अर्जुन साळवे सांगतात. बिगारी काम करणारे श्रनिवास तंगडगी सांगतात की, गाडी बाहेर काढण्याच्या अडचणीमुळे मतमोजणीच्या दिवशी कामावर जात नाही. येथे सर्व पक्षांचे पाठीराखे राहतात, पण निकालाच्या दिवशी वस्तीवर आजपर्यंत कधीही गोंधळ झाला नाही, असे ते सांगतात.

किराणा दुकान उघडे, पण...- येथील पूजा किराणा स्टोअर्सचे मालक तिमय्या तंगडगी सांगतात की, गेल्या २० वर्षांपासून ते या व्यवसायात असून, मतमोजणीच्या दिवशी कधीही आपल्याला दुकान बंद ठेवण्यास सांगण्यात आले नाही. कारण येथे हातावर काम करणाºयांची संख्या जास्त असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू ते रोजच्या रोज खरेदी करतात. पण दुकानावर जास्त गर्दी झाली की, मात्र सुरक्षा दलातर्फे लोकांना हटविण्यासाठी कडक वॉर्निंग दिली जाते.

माझं वय साठ वर्षे आहे. गोदामासमोरच घर असल्यामुळे आजपर्यंतच्या सर्व मतमोजणींची मी साक्षीदार आहे. पूर्वी मोकळे मैदान असल्यामुळे गोंधळ खूप असायचा. आता तो कमी आहे. मला निवडणुकीतील काही समजत नाही; पण मतमोजणी सुरू असताना स्पिकरवरून जी मते सांगतात. ती ऐकण्यासाठी घरातील सर्वच मंडळींचे कान गोदामाकडे असतात व तेच मला निवडणुकीचा निकाल सांगतात.- पार्वतीबाई केंचनाळकररहिवासी

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल