शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

शेतकºयांची फसवणूक करणाºया अडत्यांवर दंडात्मक कारवाई करणार, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा इशारा,  शेतमाल तारण कर्जाच्या धनादेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 2:16 PM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभागी शेतकºयांना धनादेशाचे वाटप सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देपणनमंत्र्यांच्या धोरणामुळे शेतकºयांना योजनांचा लाभराज्य सरकारच्या पारदर्शी कारभारामुळे बाजार समित्या, सहकारी सोसायट्या सक्षमपणे काम करीत आहेराज्य सरकार शेतकºयांच्या हिताची जपणूक करणारे धोरण राबवत आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : राज्य सरकार शेतकºयांच्या हिताची जपणूक करणारे धोरण राबवत आहे. आॅनलाईन लिलावामुळे पारदर्शी खरेदी-विक्री शक्य आहे. शेतमालाच्या लिलावात शेतकºयांची फसवणूक करणाºया अडत व्यापाºयांवर दंडात्मक कारवाईचा कायदा लवकरच अस्तित्वात येईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना दिली.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभागी शेतकºयांना धनादेशाचे वाटप सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख होते. महापौर शोभाताई बनशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेताना वर्षभरात मालाची आवक आणि आर्थिक उलाढाल वाढल्याचे सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना पणनमंत्री देशमुख म्हणाले, शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकºयांची पिळवणूक थांबविण्यासाठी ही योजना अस्तित्वात आली, परंतु तिचा अंमल प्रभावी नव्हता. ई-नाम वेबपोर्टल सुरू होत असून, शेतमालाचे लिलाव आॅनलाईन करण्यात येतील. आजही वेगळ्या मार्गाने व्यापारी अडत कपात करतात. तिचे समूळ उच्चाटन केले पाहिजे.पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राज्य सरकारच्या पारदर्शी कारभारामुळे बाजार समित्या, सहकारी सोसायट्या सक्षमपणे काम करीत असल्याचे सांगितले. प्रशासकामुळे सोलापूर बाजार समितीची उलाढाल दुपटीने वाढली याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पणनमंत्र्यांच्या धोरणामुळे शेतकºयांना योजनांचा लाभ होत असल्याचे सांगितले. महापौर शोभाताई बनशेट्टी यांचेही भाषण झाले. शेतकरी श्रीमंत बंडगर यांनी बाजार समितीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देणारा कायदा केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. शेतकºयांच्या मुलांना बाजार समितीकडून लॅपटॉप पुरवावेत, वसतिगृह सुरू करावे आणि स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी केली.यावेळी दक्षिण सोलापूर सभापती ताराबाई पाटील, उपसभापती संदीप टेळे, उत्तरच्या उपसभापती रजनी भडकुंबे, पं.स. सदस्य एम.डी. कमळे, शशिकांत दुपारगुडे, नवगिरे, जि.प. सदस्य अण्णाराव बाराचारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सचिन कल्याणशेट्टी, काशिनाथ कदम, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. अशोक कारडी, प्रभारी सचिव विनोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. सी.जी. हविनाळे, शिवलिंग कोडले, सुनील कळके, केदार विभुते, श्रीमंत बंडगर, संभाजी भडकुंबे, सतीश लामकाने, आप्पा गुंड, सिद्धाराम म्हेत्रे, डोणगावचे सरपंच संजय भोसले, दोड्डीचे सरपंच मल्लिनाथ गिराम आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख