शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

दूध अन्‌ तेलावर भेसळखोरांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:28 AM

सोलापूर : घराघरातल्या किचनमध्ये हल्ली दूध अन्‌ तेलाशिवाय पानच हलत नाही. आणि नेमकं यावरच भेसळखोरांचं लक्ष वेधलं जातं. अन्न ...

सोलापूर : घराघरातल्या किचनमध्ये हल्ली दूध अन्‌ तेलाशिवाय पानच हलत नाही. आणि नेमकं यावरच भेसळखोरांचं लक्ष वेधलं जातं. अन्न व औषध प्रशासन विभागाची यावर करडी नजर असते. गतवर्षी २०१९-२० मध्ये टाकलेल्या छाप्यात घेतलेल्या ४१३ नमुन्यांमध्ये ७७ ठिकाणी भेसळ आणि कमी दर्जा आढळला. चालू वर्षी २०२०-२१ मध्ये जुलैअखेर ५८२ नमुन्यांपैकी २६ ठिकाणी हे प्रमाण आढळले आहे. या भेसळखोरांपासून ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

आहारात घेतल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांतील भेसळीमुळे त्याचा थेट आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे यावर अंकुश ठेवण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून वर्षभर छापे टाकून त्या रोखण्याचे काम केले आहे. गत आणि चालू वर्षी दुधात अधिक भेसळ आढळून आली. २०२० मध्ये दुधाचे ९६ नमुने तपासणीसाठी घेतले. त्यामध्ये १ असुरक्षित आणि २२ कमी दर्जाचे आढळले. चालू वर्षी ९२ पैकी १ नमुना कमी दर्जाचा आढळून आला, तर पाच नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

आजवर टाकण्यात आलेल्या छाप्यांचा आढावा लक्षात घेता प्रामुख्याने दूध, त्यानंतर खाद्यतेल, खवा, तूप, गूळ, हळद, मधामध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले आहे.

——-

भेसळ किती

कधी घेतलेले नमुने किती

२०१९-२० ४१३ ७७

२०२०-२१ ५८२ २६

———

खरेदी करताय, अशी घ्या काळजी

बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे पॅकिंग व्यवस्थित आहे का? एक्सपायरी डेट किती आहे. प्रमाणित केल्याचे नमूद आहे का? या बाबी तपासून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खरेदी करताना चोखंदळपणे पाहणे आवश्यक असल्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून केले जाते.

——

या काळात होते अधिक भेसळ

- साधारणत: श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. नागपंचमी, गणेश चतुर्दशी, गौरी गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांमध्ये दुग्धजन्य मिठाईचे पदार्थ, लाडू, चकल्या, गूळ, बेसन अशा अनेक पदार्थांना मागणी असते. ग्राहकांची खरेदीसाठी असणारी गर्दी लक्षात घेऊन भेसळ मोठ्या प्रमाणात होते. ग्राहक नेमका इथेच फसतो. या काळात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

——

कशी ओळखावी भेसळ

- अन्नपदार्थांतील भेसळ ओळखण्याचे घरगुती साधे उपाय असल्याचे अन्न विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले. चवीवरून दुधातील भेसळ ओळखता येते. फॅट वाढविण्यासाठी दुधात साखर, युरिया, मीठ, गोडेतेलाची भेसळ केली जाते. प्रोटीन वाढविण्यासाठी मिल्क पावडर, स्वाबीटाॅल, पॅराफिन, गुल्कोज हे घातक रसायन वापरले जाते. प्रयोगशाळेतच याची तपासणी होते. हळदीत हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकल्यास ते निळे झाल्यास भेसळ आहे असे ओळखावे. शुद्ध मध लगेच पेट घेते. तेलात पामतेल मिसळले जाते.

-----

आपल्याकडे प्रामुख्याने दूध, पेढा, खवा, गोडेतेल, हळद यामध्ये भेसळ आढळते. दूध व खव्यातील भेसळ शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे यावर लक्ष देऊन कारवाया केल्या जातात. ग्राहकांनी खरेदी करताना भेसळीचा संशय आल्यास आमच्या विभागाकडे संपर्क साधावा.

- प्रदीप राऊत, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन

----