सोलापूर : राज्यातील सर्व गावांतील (गावठाण) जमिनीचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्याबाबतची योजना राबविण्यात येत आहे. सर्व गावांचे भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करणे, गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करणे अशा दोन भागात ही योजना राबविण्यात येणार आहे. उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे.
अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीच्या गावांचे गावठाणातील सर्व मिळकतधारकांचे मिळकतीचे मोजमाप व नकाशा तसेच आखीव पत्रिका तयार करण्याचे काम जलदगतीने सुरू झाले आहे. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन हा महत्त्वाकांक्षी व जनताभिमुख प्रकल्प असून सदर प्रकल्पामुळे गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारे सर्वेक्षण होऊन गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे.--------------
काय आहे स्वामित्व योजना?भूधारकांना आपल्या मिळकतीची सीमा व नेमके क्षेत्र माहीत होणार आहे. गावठाणातील धारकांना आपले मालमत्तेचे अधिकार (अभिलेख पुरावा) म्हणजेच मालमत्ता पत्रक (मिळकत पत्रिका) मिळणार आहे. मालमत्ता पत्रक म्हणजेच गावठाणातील घर व जागेचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने त्या आधारे मालमत्ताधारकांना कर्ज उपलब्ध होऊ शकेल. तसेच तारण म्हणून त्यांना जामीनदार म्हणूनही राहता येणार आहे. तसेच विविध आवास योजनेत मंजुरी मिळणे शक्य होणार आहे.------------१० ते १५ मिनिटांत मोजणी
ड्रोनद्वारे मोजणी करताना ग्रामस्थांना चुन्याद्वारे मार्किंग केले जाते आणि नंतर ड्रोनद्वारे मोजणीला सुरुवात होते. यावेळी ५ ते ६ गावांचे सर्वेक्षण करायला ३०-४० मिनिटांचा अवधी लागतो.--------
ई-प्रॉपर्टी कार्डही मिळणारप्रत्येक गावकऱ्याला मिळणार नकाशा अन् पीआर कार्ड ड्रोनद्वारे मोजणी केल्यावर प्रत्येक गावकऱ्याला नकाशा, प्रॉपर्टी कार्ड (सनद) दिले जाते. गावठाणातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड लवकर उपलब्ध होणार असून त्यातून गावातील अतिक्रमणे जमिनीच्या वादासह अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
------------