सोलापूर : पै पै करून उभारलेले घर आणि उसाचे पीक वादळी वाऱ्याने आडवे केले़़़ इतक्यावर न थांबता वादळाने कहर केला़़़ पत्र्यावरील दगड पडून दाम्पत्य जखमी झाले़़़त्याहीपुढे जाऊन डोक्यावर छत न राहिल्याने सहा क्विंटल ज्वारी पाण्यात भिजली आणि तोंडचा घासही पावसाने हिरावला़़़ औज(मं़)येथील पंचप्पा काळे गरीब शेतकरी कुटुंबाच्या कहाणीने हृदय हेलावून सोडले़ ६ जून रोजी रात्री ८ वाजता सोसाट्याचा वारा सुटला़ वादळात शेतकरी पंचप्पा काळे (वय ६८), महादेवी काळे (वय ५५) सापडले़ घराचा दरवाजा उघडून बाहेर पडत असताना दोघांच्याही डोक्यावर दगड कोसळले़ दोन्ही खोल्यांवरील पत्रे उडाले. मदतीला कोणी येऊ शकत नाही़ नेते-पुढाऱ्यांच्या मागे फिरणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला उघड्यावर आलेल्या कुटुंबाकडे पाहायला वेळ नाही़ पत्नीने आजारी पतीला घेऊन कसेबसे खासगी रुग्णालय आणि नंतर सरकारी रुग्णालयात उपचार केले़ शेती करून गुजराण करणारे पंचप्पा यांना काही दिवसांपूर्वी लकव्याचा आजार जडला़ या वादळाने या कु टुंबाचे कंबरडेच मोडले़
वाऱ्याच्या तडाख्यात दाम्पत्य जखमी
By admin | Published: June 14, 2014 1:18 AM