नवनाथ कसपटे यांनी तीन दशकांपासून सीताफळ शेती आणि त्याचे विविध वाण निर्मिती संशोधन पणन प्रचार प्रसार, प्रबोधन व सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन काम आहे. त्यांच्या परिश्रमातून बांधावरच्या सीताफळाला फळबागेमध्ये रुपांतरित केले आहे. शिवाय त्यांनी विकसित केलेल्या वाणाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन केंद्रीय कृषीमंत्रालयाने त्यांना पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २००१ अंतर्गत स्वामीत्व हक्क प्राप्त करून दिला आहे; मात्र त्यांच्या या वाणाचे नाव बदलून रोपांची विक्री करणाऱ्या रोपवाटिका चालकांवर नुकसान भरपाईची कारवाई करावी, अशी मागणी दिवाणी, फौजदारी स्वरुपाचे खटले दाखल करून न्यायालयाकडे केली आहे. तसेच त्यांच्याकडून ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम वसूल करून मिळण्याची मागणी या दाव्यामध्ये केल्याचे ॲड. गणेश हिंगमिरे व ॲड. संजय खंडेलवाल यांनी सांगितले.
सीताफळ पेटेंटचे उल्लंघन करणाऱ्या २७ रोटवाटिकांवर न्यायालयात दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:22 AM