येथील ज्ञानेश्वर मनोहर मोटे पंधरा दिवसांपासून खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दोन सख्खे चुलत भाऊ आणि चुलतीच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावामध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे आरोग्य विभागही हतबल झाला आहे. आजवर गावामध्ये २३ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. २३ पैकी ७ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११५ वर गेली आहे.
यातील ८५ जण कोविड सेंटर येथे उपचार घेऊन घरी परतले आहेत. उर्वरित कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत. काहीजण सोलापूर, पुणे येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
---
कुटुंबावर शोककळा
मृत्यू पावलेले ज्ञानेश्वर मोटे हे शेती व्यवसाय करत होते. शेती तशी जेमतेमच सोबत मळणी मशीन होती. त्यावर ते आपला उदरनिर्वाह भागवायचे. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. परंतु ऐन तारूण्यात त्यांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच घरातील तिघांचे निधन झाल्याने घरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
----