सोलापूर : राज्य सरकारच्या धोरणांविराेधात महाविकास आघाडीतील पक्ष व इतर घटक पक्षाकडून विधानसभेतवर आक्रोश मोर्चा निघणार आहे. यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. उदय नारकर यांनी गुरुवारी सोलापुरात दिली.
माकपच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय बैठकीचा समारोप गुरुवारी झाला. या वेळी डॉ. नारकर यांनी आक्रोश मोर्चाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच बाळासाहेब थोरात यांनी आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. त्यांच्या निमंत्रणानुसार आम्ही मोर्चात सहभाग होणार आहोत.
राज्यातील हजारो कामगारांना यात सहभागी करून घेणार आहोत. तसेच केंद्र सकारच्या धोरणांविरोधात ५ एप्रिलला संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. याची तयारी आता पासून सुरु केली आहे. हा मोर्चा देशव्यापी असणार आहे. माकपच्या पुढाकारातून मोर्चा निघणार असून देशभरातील लाखो कामगार यात सहभागी होणार आहेत.