अक्कलकोट : योग ही साधना असून माणसाचे आचार-विचार शुध्द करणारे तंत्र आहे़ शरीर आणि मनाच्या अस्वच्छतेसोबत बलशाली राष्ट्र निर्माण करण्याची ताकद योगामध्ये आहे़ योगाचा सृजनात्मक उपयोगच देशाला पुढे नेईल आणि उद्योगातून समृध्दी उभारण्यासोबतच देशाला आर्थिक महासत्ता बनवेल असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले़अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह मैदानावर शनिवारी सकाळी त्यांच्या योगचिकित्सा शिबीराला प्रारंभ झाला़ त्यानंतर योग शिबीर कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिबीराचे आयोजक सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते़यावेळी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, भारत आज रोगमुक्ती आणि व्यसनमुक्तीकडे जात आहे़ त्याचे श्रेय योगाला आहे़ भारत जगात महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून योगमार्गातून प्रवास सुरू आहे़ भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे़ योगाने विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखविला असून सर्व व्याधी, आजार, नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती योगात आहे़ योगाचा सृजनात्मक वापरच देशाला जगात अग्रस्थानी पोहचवेल़देशातील भ्रष्ट्राचार दुर करण्यासाठी उत्तम आचरणाची आणि योग शिक्षणाची गरज आहे़ मनाची शुध्दता करण्याचे काम योगच करू शकतो, तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्ट्राचार थांबविण्यासाठी आवश्यक आहे़ पंतप्रधान मोदी यांनी डिजीटललायझेशनच्या माध्यमातून हे काम सुरू केले आहे़ शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सेंद्रीय शेतीचा पर्यायही बाबा रामदेव यांनी सुचविला़ ते म्हणाले की, तांत्रिक शेती, वैज्ञानिक शेती आणि सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून देशातील कृषी व्यवस्थेचे चित्र बदलू शकते, शेतकºयांनी जोडधंदा, पशुपालन करावे असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला़
योगाचा सृजनात्मक उपयोगच देशाला पुढे नेईल - बाबा रामदेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:20 PM
अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह मैदानावर योगचिकित्सा शिबीराला प्रारंभ
ठळक मुद्देभारत आज रोगमुक्ती आणि व्यसनमुक्तीकडे जात आहे़ - बाबा रामदेवयोगाने विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखविला - बाबा रामदेवशेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सेंद्रीय शेतीचा पर्यायही बाबा रामदेव यांनी सुचविला़