तत्कालीन झेडपी अध्यक्ष संजयमामा शिंदे व तत्कालीन सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांच्या कार्यकाळात ५ मार्च २०१९ रोजी उमरड, सावडी व अक्कलकोट तालुक्यातील अशी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाली. त्यासाठी प्रत्येकी ६५ लाख याप्रमाणे १ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्याचा प्रशासकीय मंजुरी आदेशही माझ्याकडे आहे. उमरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी आदेश मार्च २०१९ मध्ये निघाला होता. ऑक्टोबर २०१९ पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून संजयमामा शिंदे यांनी कामकाज पाहिले आहे. विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची अध्यक्ष म्हणून निवड ३१ डिसेंबर २०१९ रोजी झालेली आहे .या सर्व घटनाक्रमकडे पाहिले असता असे लक्षात येते की, अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष होण्याच्या १० महिने अगोदरच उमरड येथील आरोग्य केंद्राचे काम मंजूर होऊन त्यासाठी प्रत्यक्ष ६५ लाखांची तरतूदही केलेली होती. यावरूनच विद्यमान अध्यक्ष कांबळे यांनी केलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन हे लोकांचे दिशाभूल करणारे आहे.
उद्घाटनाचा देखावा कशाला
उमरड येथील आरोग्य केंद्राचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. नळ फिटिंग, लाईट फिटिंग, फरशी बसवणे, ब्लॉक बसवणे इत्यादी कामे अपूर्ण आहेत. असे असताना अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी उद्घाटनाचा देखावा कशासाठी केला, असा सवालही वामनराव बदे यांनी उपस्थित केला आहे.
फोटो
१०करमाळा-उमरड
ओळी : जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी उद्घाटन केलेले हेच ते उमरडचे आरोग्य केंद्र.