अतुल खुपसे-पाटील (रा. उपळवाटे, ता. माढा), दिपाली डिरे, अतुल राऊत, महावीर राऊत, दत्तात्रय डिरे, संतोष राऊत, सचिन राऊत, अक्षय राऊत सर्व (केत्तूरनं १ ता करमाळा), बाळासाहेब माने, विलास मेरगळ, प्रकाश काळे, प्रकाश माळशिकारे माने (सर्व रा. गुलमोहरवाडी ता.करमाळा), राजेंद्र खटके, नितीन खटके, केत्तूर २), तात्या खाटमोडे, माऊली खाटमोडे (दिवेगव्हाण), नाना सरवदे, जयवंत पांढरे, भय्यू मोरे, प्रशांत पांढरे, संतोष शिंदे, महादेव सरोदे, बापू लोकरे (पारेवाडी ता. करमाळा), शरद एकाड (सावडी) यासह १०० अनोळखी आंदोलनकर्त्यावर गुन्हा नोंदला आहे.
खूपसे-पाटील यांनी पारेवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सबस्टेशन येथे तसेच तहसील कार्यालय करमाळा व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे करमाळा कार्यालय येथे विनापरवाना तसेच भाजपा कार्यालय करमाळा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयाने काही शेतकऱ्यांचे वीजबिल थकीत असल्या कारणावरून वीज कनेक्शन कट केल्याचे कारणावरून मोठमोठ्याने नारेबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदला आहे.
रास्तारोको आंदोलन स्थगित
वीज प्रश्नी करमाळा-जेऊर मार्गावर कुंभेज फाटा येथे मंगळवारी सकाळी १०वाजता रास्ता रोको आंदोलन केले जाणार होते पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान रास्ता रोकोच्या इषा-यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
----