पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनशक्ती संघटनेने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर ट्रॅक्टर वाहनासह एकत्र जमावाने जमून मोर्चा काढून, कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ नये याकरिता कोणतीही खबरदारी घेतली नाही. मास्क व सोशल डिस्टन्सिंग न ठेवता जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लघंन केले. यामुळे अतुल खुपसे (रा. उपळवटे, ता. माढा), नानासाहेब इंगळे, इब्राहिम मुलाणी, बापू मोहिते, गणेश ढोबळे (रा.उंबरे पागे), आबासाहेब पात (रा. पुळुज), विशाल विष्णू माने (रा. नारायणचिंचोली, ता. पंढरपूर), सोमेश्र्वर क्षीरसागर (रा. मोहळ), संजय कोकाटे (रा. टेंभुर्णी), कल्याण जाधव (रा. औरंगाबाद), पवार (रा. फलटण, ता.जि. सातारा) व अंदाजे ८० ट्रॅक्टरच्या अनोळखी चालकांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल सोनकांबळे करत असल्याची माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांनी दिली.
पंढरीत आंदोलन करणार्या ८० ट्रॅक्टरचालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:25 AM