विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. शेवटी पोलिसांनी दहा दिवसांपासून पोलीस निरीक्षक गवळी यांनी कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आणि अंमल सुरू झाला आहे. दहा दिवसांत विनामास्क फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे, विनाकारण फिरणारे, कायदा मोडून दुकाने सुरू ठेवलेल्याचे दुकाने सील करणे असे विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या ३७१४ जणांवर दंडात्मक तर काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
यासाठी फौजदार चंदू बेरड, रेवणसिद्ध काळे, वाहतूक पोलीस आर. पी. शेख, सी. बी. बेळ्ळे, आय. आय. शेख, संजय जाधव, मल्लिनाथ कलशेट्टी, सुरेश जाधव, अजय भोसले, एजाज मुल्ला, किसन घंट्टे, अरुण राऊत, शंकर राठोड, सुनील माने, सुभाष दासरी, रणजित भोसले, लक्ष्मण कांबळे, अजय शिंदे, श्रीकांत जवळगे, इरणा सुतार, मंगरुळे यांच्या पथकाने दिवस-रात्र कारवाईचे अस्त्र उगारलेले आहे.
----
अशी झाली कारवाई
दहा दिवसांत विनामास्क फिरणारे १,८८३, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- ६७८, सोशल डिस्टन्सिंग ७६९, विनाकारण फिरणारे ३८४, दुचाकी जप्त- ६०, दुकाने सील-३० अशा ३,७१४ लोकांवर कारवाई करण्यात आली. या माध्यमातून १३ लाख, ५४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
----
कोरोनाचे कहर वाढत असताना विनाकारण फिरणे, कोरोनाचे नियम पायदळी तुडवणे अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारला. म्हणून आज रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहेत. नियम पाळण्याची जबाबदारी प्रशासनासह नागरिकांचीही आहे. हे होत नसल्याने पोलिसांना शेवटी कारवाई करावी लागत आहे.
- राजेश गवळी, पोलीस निरीक्षक.
----२७अक्कलकोट ॲक्शन१,२
दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना रुग्णांचे वाढत्या पार्श्वभूमीवर कारवाई करत असताना पो.नि. राजेश गवळी, पो. उपनिरीक्षक चंदू बेरड, पोलीस कर्मचारी आदी.