शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सोलापूर जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण वाढले, माहिती अधिकारात सत्यता उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:14 PM

तपासातील चुका आणि साक्षीदारांची फितुरी याचा कोणत्याही गुन्ह्यातील शिक्षेच्या प्रमाणावर नेहमीच परिणाम होतो.  आरोपींना शिक्षेचे प्रमाण कमी असल्याची ओरडसुद्धा नेहमीच होते; मात्र गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा आरोेपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आली आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाºया फौजदारी खटल्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आजवरच्या सर्वच सरकारी वकिलांनी प्रयत्न केलेपोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी अनेकदा आरोपींना शिक्षा देण्यात अडसर येतातअलीकडच्या काळात गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सरकारी वकिलांच्या नजरेखालून घालण्यात येत आहे

अमित सोमवंशी सोलापूर दि १८ : तपासातील चुका आणि साक्षीदारांची फितुरी याचा कोणत्याही गुन्ह्यातील शिक्षेच्या प्रमाणावर नेहमीच परिणाम होतो.  आरोपींना शिक्षेचे प्रमाण कमी असल्याची ओरडसुद्धा नेहमीच होते; मात्र गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा आरोेपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आली आहे.सत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाºया फौजदारी खटल्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आजवरच्या सर्वच सरकारी वकिलांनी प्रयत्न केले आहेत. पोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी अनेकदा आरोपींना शिक्षा देण्यात अडसर येतात. अलीकडच्या काळात गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सरकारी वकिलांच्या नजरेखालून घालण्यात येत आहे. आजवर झालेल्या चुका दुरुस्त होऊ लागल्या. त्याचा चांगला परिणाम न्यायालयीन खटल्यातील शिक्षेच्या प्रमाणावर झाला आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षाच्या बाजूने निकाल होण्याचे प्रमाण दोन वर्षांत दुप्पट झाले आहे. सन २०१५ या वर्षात २२.५४ टक्के असलेले प्रमाण २०१६  साली ३१.५ टक्के झाले आणि २०१७ साली ४५.३५  टक्के झाले. -------------------- सोलापूर न्यायालयातील फौजदारी खटल्यांमध्ये जयसिंह मोहिते-पाटील, कुमार करजगी,शरद मुथा, आ. रमेश कदम, मनोज जैन इफेड्रिन प्रकरण, समाजकल्याण खात्यातील अपहार,पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरण,  काटगावकर फसवणूक प्रकरण, मनोहरभाऊ डोंगरे खुनीहल्ला प्रकरणातील आरोपी, तौफिक शैख,सुरेंद्र कर्णिक,उदय पाटील आणि  सालार ग्रुप यांचा समावेश आहे.---------------आरोपींना झालेली शिक्षा- जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर यांनी चालविलेल्या १५ पैकी ५ खटल्यांचे निकाल लागले असून यात पाचही केसमध्ये आरोपींना शिक्षा झाली. तीन खटल्यांमध्ये जन्मठेप व दोन लाख रुपयांचा दंड न्यायालयाने आरोपींना ठोठावला आहे. उर्वरित खटले निकालाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. जिल्हा सरकारी वकिल यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व किंवा जामीन मंजूर मिळू दिला नाही हे विशेष .----------------------न्यायालयातील सुरक्षाही वाढवली- शिक्षेचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असले तरी गुन्हेगारांची हिम्मतसुद्धा वाढल्याचे लक्षात आले. मागील दोन महिन्यांखाली सोलापूर न्यायालयात काही जणांनी न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारागृहातील एका बंदीने पोलीस शिपायावर हल्ला केला. त्यामुळे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ केली.--------------------सरकारने टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरविल्याचे समाधान आहे. सरकारपक्षाच्या  बाजूने आलेले यश हे संपूर्ण सरकारी वकिलांच्या टीमचे आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीने व कष्टाने हे शक्य झाले आहे. -संतोष न्हावकर, जिल्हा सरकारी वकील------------------तीन वर्षांतील फौजदारी केसेस वर्ष    २०१५    २०१६    २०१७दाखल केसेस          ३५११    ३७१२    ४३४४निकाली केसेस    २८५६    १८२८    ३७७५सरकारच्या बाजूने निकाली    ६४४    ५७६    १७१२टक्केवारी    २२.५४    ३१.०५    ४५.३५

टॅग्स :Solapurसोलापूर