पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणीच्या लाडू प्रसाद विक्रीतून मिळालेल्या रकमेत अफरातफर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्याला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने निलंबित केले आहे.आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखो भाविक घेतात. घरी परतत असताना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करुन घेऊन जातात. या माध्यमातून मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यात्रा कालावधीत लाडू विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी ३ लाख ५० हजार रुपये कर्मचारी मोहन चंद्रकांत औसेकर याने समितीकडे जमा केले नाहीत. ही बाब मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. यामुळे औसेकर याला १० दिवसासाठी निलंबित केले व त्याच्याकडून सक्तीने ही सर्व रक्कम वसूल करण्याची कारवाई मंदिर समितीने केली.विठ्ठलाच्या लाडू प्रसादाचे सर्व पैसे मोहन औसेकर याच्याकडून वसूल करुन घेतले आहेत. त्याला काही दिवसासाठी निलंबित केले आहे.- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
पंढरपुरात विठ्ठलाच्या महाप्रसादात अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:28 AM